Devendra Fadnavis  Pudhari
सांगली

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस उद्या सांगली दौऱ्यावर

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक दौरा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सांगली दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी शनिवारी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित सांगली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन, कार्यक्रमाची रूपरेषा, तसेच पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सोमवार, दि. १९ रोजी दुपारी १२ वाजता धामणी रोडवरील खरे क्लब हाऊस येथे पदवीधर व शिक्षक मेळावा आयोजिला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढविणे, संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्रिय करणे आणि निवडणुकीसाठी आवश्यक नियोजन करणे या बाबींवर बैठकीत भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचे नियोजन करताना जिल्ह्यातील पदाधिकारी आणि संघटनात्मक यंत्रणेमध्ये समन्वय राखण्याबाबतही चर्चा झाली.

बैठकीस आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, भाजपचे प्रदेश सचिव शरद लाड, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा बॅंक संचालक राहुल महाडिक, संचालक चिमण डांगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, अमरसिंह देशमुख, वैभव पाटील, ब्रह्मानंद पडळकर, डॉ. रवींद्र आरळी, विलास काळेबाग आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT