Chandrakant Patil 
सांगली

Chandrakant Patil : ग्रंथालय कर्मचारी मानधनात वाढ, नव्या ग्रंथालयांना मान्यता

ग्रंथोत्सव समारोपात शिक्षणमंत्री पाटील यांची भरघोस आश्वासने

पुढारी वृत्तसेवा

सांगली : राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन वाढीसाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. राज्यात सुमारे 2 हजार नवीन ग्रंथालयांना मान्यता देऊ. वर्गीकरण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक करू. जिल्हा नियोजन समिती, खासदार व आमदारांचा निधी ग्रंथालयांसाठी देऊ. 100 वर्षापेक्षा जास्त जुन्या ग्रंथालयांना मदत करण्याची शासनाची भूमिका आहे, अशी आश्वासने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सांगली कार्यालयामार्फत ग्रंथोत्सव- 2025 च्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथे आयोजित या ग्रंथोत्सवास खासदार विशाल पाटील, पुणे विभागाच्या प्रभारी सहायक ग्रंथालय संचालिका श्रेया गोखले, बाळासाहेब यादव, नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांतील उत्कृष्ट ग्रंथपाल व वाचक यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी ग्रंथोत्सवअंतर्गत लावण्यात आलेल्या पुस्तक व ग्रंथ स्टॉलना भेट दिली.

दरम्यान, ग्रंथोत्सव-2025 अंतर्गत दुसऱ्या दिवशी सकाळी चला, विज्ञानाच्या नजरेतून पर्यावरणाचे संवर्धन करूयात या विषयावर चर्चासत्र पार पडले. यामध्ये डॉ. आर. एस. साळुंखे आणि संजय बनसोडे यांनी सहभाग घेतला. संवादक हर्षा बागल होत्या. विश्वनाथ गायकवाड यांनी कथाकथन सादर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT