Chandrakant Patil  File Photo
सांगली

Chandrakant Patil: धमक्या येत असतील तर दीपके यांनी पुरावे द्यावेत

चंद्रकांत पाटील; पोलिसांचा अहवाल चक्रावणारा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : कॉक्रोच पार्टीचे नेते अभिजित दीपके यांना धमक्या येत असतील, तर त्यांनी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार करून पोलिसांना पुरावे द्यावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी गुरुवारी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीतील आंदोलनप्रकरणी पोलिसांनी दिलेला विशेष अहवाल चक्रावणारा आहे. तो पाहिला तर चक्कर येईल. पोलिसांनी पकडलेले सर्वजण कोणकोणत्या गुन्ह्यांत होते, याची माहिती अहवालात आहे. पोलिसांनी त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही आकडेवारी दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, पोलिस किंवा शासनावर आरोप करणारे कॉक्रोच पार्टीचे नेते अभिजित दीपके यांनी आरोपांचे पुरावे पोलिसांना द्यावेत,किंवा त्यांनी न्यायालयात दाद मागावी. त्यांना धमक्या येत नसतील असे माझे म्हणणे नाही; पण धमकी देणारा भाजपचाच आहे हे कशावरून? काँग्रेसचा कार्यकर्ताही फोनवरून भाजपचा कार्यकर्ता आहे असे सांगून धमकी देऊ शकतो. त्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आरोप सिद्ध करण्याची व्यवस्था आंदोलनकर्त्यांनी उभी केली पाहिजे.

ते म्हणाले,लोकशाहीची सुंदरता अशी आहे की, कोणीही आरोप करू शकतो. राहुल गांधीदेखील आरोप करत आहेत. मात्र, आरोप केले म्हणजे ते सर्व खरे असतात असे नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT