चांदोलीत 49.76 टक्के पाणीसाठा 
सांगली

Chandoli Dam : चांदोलीत 49.76 टक्के पाणीसाठा

20 पाझर तलाव कोरडे; इतर धरणांतील साठाही घटला

पुढारी वृत्तसेवा

शिराळा ः तालुक्यासाठी जीवनदायी ठरलेल्या चांदोली धरणातील पाणीसाठा उन्हामुळे वेगाने कमी होत आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. पुढील काळात पाणी नियोजनाचे मोठे आव्हान असेल. तालुक्यातील मोरणा, शिवणी, करमजाई, अंत्री आणि रेठरे धरणातील साठाही लक्षणीयरीत्या घटला आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा व ग्रामीण भागातील पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

चांदोली धरण - सध्याची स्थिती

साठा - 13.693 टीएमसी

धरण भरले - 49.76 टक्के

विसर्ग - 3048 क्युसेक

वीज निर्मितीसाठी - यामध्ये 1700 क्युसेक

नदीपात्रात सोडतात - 1750 क्युसेक

तालुक्यात 20 पाझर तलाव पूर्ण कोरडे

29 पाझर तलावांत अत्यल्प साठा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT