Chandoli Dam 
सांगली

Sangli News : चांदोली, कोयना ८६ टक्के भरले

दोन्ही धरणांतून विसर्ग कायम : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वारणावती : पश्चिम महाराष्ट्रातील धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना आणि वारणा (चांदोली) धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्‍या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. दोन्ही धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे कोयना व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी यांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना आणि वारणा (चांदोली) धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्‍या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. दोन्ही धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे कोयना व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी यांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

चांदोली धरण

वारणा (चांदोली) धरण - २९.७६ टीएमसी (८६.५२ टक्के)

उपयुक्त पाणीसाठा - २२.८८ (८३.१४)

गेल्यावर्षी याच दिवशी हा साठा - २१.५० (७८.१४)

धरण पातळी - ६२२.३७ मीटर

पाणी-आत बाहेर क्युसेकमध्ये

धरणात आवक - ७,३६०

सध्याचा विसर्ग - ६,९००

मुख्य दरवाजातून विसर्ग - ५,५००

पायथा वीजगृहातून - १,४००

२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ५१ मि.मी. पाऊस

हंगामातील एकूण पाऊस - १,६३२ मि.मी.

कोयना धरण

रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ९१.३१ टीएमसी

(८६.७६ टक्के) एकूण पाणीसाठा

उपयुक्त पाणीसाठा : ८६.१९ टीएमसी (८६.०८ टक्के)

धरण पातळी २१५२ फूट ८ इंच (६५६.१३३ मीटर)

पाणी-आत बाहेर क्युसेकमध्ये

आवक - ४९ हजार ०७३

विसर्ग - ३३ हजार८२६

वक्र दरवाजांमधून विसर्ग - ३२ हजार ७७६

पायथा वीजगृहातून विसर्ग - १ हजार ०५०

रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासातील पाऊस मि.मी.मध्ये कंसात हंगामातील एकूण पर्जन्यमान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT