Theft Pudhari
सांगली

Chain snatching: घरात घुसून महिलेच्या गळ्यातील चेन हिसडा मारून पळवली

एका अपार्टमेंटमधील फ्लॅटची बेल वाजविल्यावर बाहेर आलेल्या महिलेच्या गळ्यातील 65 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून चोरट्यांनी पलायन केले

पुढारी वृत्तसेवा

सांगली : एका अपार्टमेंटमधील फ्लॅटची बेल वाजविल्यावर बाहेर आलेल्या महिलेच्या गळ्यातील 65 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी गुलमोहर कॉलनी परिसरात घडली.

याप्रकरणी निशा विजयकुमार शहा (वय 59, रा. मनीषा अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी फिर्यादी निशा शहा यांच्या फ्लॅटची बेल वाजली. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी बाहेरील बाजूस अंदाजे पाच फूट उंचीचा अनोळखी व्यक्ती उभा होता. फिर्यादी निशा शहा यांनी दरवाजा उघडून बाहेर येऊन काय पाहिजे? असे विचारले.

त्याचवेळी चोरट्याने क्षणाचाही विलंब न करता शहा यांच्या गळ्यातील साडेबारा ग्रॅमची सोन्याची चेन हिसकावली. निशा शहा यांनी आरडाओरडा केली, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT