Gopichand Padalkar  (Pudhari Photo)
सांगली

Gopichand Padalkar: जात पडताळणी समित्यांकडून पैसे खाऊन दाखले

आमदार गोपीचंद पडळकर : पृथ्वीराज पाटील यांच्या दाखल्यावर आक्षेप

पुढारी वृत्तसेवा

विटा : राज्यातील सर्व जात पडताळणी समित्या पैसे खाऊन चुकीची कामे करतआहेत, असा घरचा आहेर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी राज्यातील महायुती सरकारला दिला.

आमदार पडळकर यांनी मंगळवारी दुपारी मुंबईत भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणबी प्रमाणपत्र वितरणामध्ये प्रचंड मोठी अफरातफरी झालेली आहे, असा आरोप त्यांनी केला.

पडळकर यांनी सांगलीच्या जात पडताळणी समितीच्या कारभाराचे उदाहरण दिले. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजी पाटील नावाचा एक उमेदवार, जो मराठा आहे, तो कुणबी दाखल्यावर उभा होता. तो निवडून आला आहे. या पृथ्वीराज तानाजी पाटील यांनी जातीचा पुरावा म्हणून वडील तानाजी भगवान पाटील, आजोबा भगवान बाळू पाटील आणि त्यांचे वडील म्हणजे पणजोबा बाळू पाटील यांचा मृत्यूचा दाखला पुरावा म्हणून जोडलेला आहे. त्यामध्ये मोठा घोळ आहे. जात पडताळणी समितीने पृथ्वीराज पाटील यांना कुणबी दाखला दिलेला आहे. जात पडताळणी समितीने अशी कोणती कागदपत्रे तपासली, की ज्या आधारे पृथ्वीराज पाटील यांना कुणबी दाखला दिला? माझा आक्षेप जात पडताळणी समितीवर आहे.

सांगलीच्या जात पडताळणी समितीवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, या समितीमधील सर्वांची सखोल चौकशी केली पाहिजे आणि पृथ्वीराज पाटील यांना दिलेले कुणबी दाखल्याचे प्रमाणपत्र रद्द झाले पाहिजे. पृथ्वीराज पाटील यांचे जिल्हा परिषद सदस्यपद रद्द करण्यात यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT