ऊसतोडीनंतर रात्रीच्या अंधारात मोकळे फड पेटविण्याचे प्रकार सर्रास वाढले! 
सांगली

Sangli Fire : ऊसतोडीनंतर रात्रीच्या अंधारात मोकळे फड पेटविण्याचे प्रकार सर्रास वाढले!

पालापाचोळा जाळण्याच्या प्रकारामुळे पर्यावरणाला धोका; धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

बोरगाव : ऊसतोडणी पूर्ण झाल्यानंतर शेतात शिल्लक राहिलेला उसाचा पाचट, पालापाचोळा आणि इतर अवशेष यांची विल्हेवाट लावण्यासाठी काही ठिकाणी रात्रीच्या वेळी संपूर्ण मोकळे झालेले ऊसफड पेटवून देण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्या अंधारात पेटविण्यात येणाऱ्या या फडांमधून आगीचे मोठे लोळ आणि धुराचे लोट आकाशात पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.

ऊसतोड झाल्यानंतर शेतात मोठ्या प्रमाणात पाचट आणि पालापाचोळा शिल्लक राहतो. त्याची नैसर्गिक पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना त्या ऐवजी सर्रास शेतकरी वेळ आणि श्रम वाचविण्यासाठी थेट आग लावण्याचा मार्ग स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे.

रात्रीच्या वेळी अशा प्रकारे फड पेटविल्याने आगीचे लोळ दूरवरूनही स्पष्टपणे दिसतात. परिसरात धुराचे दाट ढग पसरत असल्याने हवेच्या प्रदूषणात भर पडत आहे. शेतातील पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे नुकसान होण्याबरोबरच उपयुक्त सूक्ष्मजीव आणि कीटकांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT