Accident Pudhari
सांगली

Sangli Accident : देवर्डे येथे मोटारीची दुचाकीला धडक; तिघे गंभीर जखमी

वाळवा तालुक्यातील देवर्डे गावाच्या हद्दीत काल सकाळी झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले

पुढारी वृत्तसेवा

कुरळप : वाळवा तालुक्यातील देवर्डे गावाच्या हद्दीत काल सकाळी झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत संग्राम विजय भोसले (वय 24, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) यांनी कुरळप पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक संतोष सूर्यकांत काळभोर (रा. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम विजय भोसले, हरिबा शंकर लोहार, महादेव मारुती कुंभार (सर्व रा. चिकुर्डे) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दि. 19 फेब्रुवारीरोजी देवर्डे येथील विलास विष्णू देसाई यांच्या घराजवळ कार (एम.एच. 07 ए.पी. 9279) वरील चालक संतोष काळभोर याने त्याच्या ताब्यातील कारने (एमएच 10 ए.ए. 6584) मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये संग्राम भोसले, हरिबा लोहार, महादेव कुंभार हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात मोटरसायकल व कारचे मिळून अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास कुरळप पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT