मिरज : शहरातील सुमतीनगर येथे बंद घर फोडून चोरट्याने पाच लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी दीपक सूर्यकांत शहा यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी दीपक शहा हे दि. 22 रोजी दुपारी 4 वाजता बाहेर गेले होते. ते दि. 23 रोजी मध्यरात्री एक वाजता घरी परतले. यादरम्यान त्यांच्या बंद घरावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लाकडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून पोबारा केला. दीपक शहा घरी परतल्यानंतर चोरीची घटना निदर्शनास आली. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.