सांगली

Borgaon Murder Case: बोरगावातील खूनप्रकरणी प्रियकराला पोलिस कोठडी

रसिका कदम हिच्या खूनप्रकरणी तुकाराम शंकर वाटेगावकर (वय 38, रा. बोरगाव) याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : येथील रसिका कदम हिच्या खूनप्रकरणी संशयित तुकाराम शंकर वाटेगावकर (वय 38, रा. बोरगाव, ता. वाळवा) याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तुकाराम याला शनिवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. तुकाराम याच्याविरोधात खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसिका हिचा मुलगा ओंकार याने पोलिसात फिर्याद दिली आहे.

संशयित तुकाराम व रसिका यांच्यात प्रेमसंबंध होते. चारित्र्याच्या संशयावरून व पैशाच्या देव-घेवीवरून या दोघांमध्ये खटके उडत होते. मंगळवारी तुकाराम व रसिका हे दुचाकीवरून बोरगाव येथे गेले होते. तुकाराम याच्या शेडवर दोघांमध्ये वाद झाला होता.

वादातून तुकाराम याने रसिकाचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून तिच्याच दुचाकीवरून ताकारी पुलावर नेला व नदीपात्रात फेकला होता. तसेच दुचाकीही पाण्यात फेकली होती. चौथ्या दिवशी साटपेवाडी बंधाऱ्याजवळ रसिका हिचा मृतदेह सापडला.

शुक्रवारी तुकाराम याच्याविरोधात खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. उपअधीक्षक अरुण पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT