बोरगावात दोन बिबट्यांची दहशत 
सांगली

Leopard sighting : बोरगावात दोन बिबट्यांची दहशत

शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

बोरगाव : बोरगाव येथील खारावडा परिसरातील चोपण वाटेवर असणाऱ्या मोहन वाटेगावकर यांच्या मळ्यातील झाडावर बसलेला एक व झाडाखाली एक अशा दोन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान वाटेगावकर हे मळ्यात आले असता त्यांच्या शेतातील कडुलिंबाच्या झाडावर व खाली असे दोन बिबटे आढळले. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील शेतकऱ्यांना सावध केले. दरम्यानच्या काळात हे दोन्ही बिबटे उसामध्ये दिसेनासे झाले. या घटनेची माहिती व व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे सर्वत्र समजताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, रब्बी हंगामात हाता-तोंडाशी आलेली पिके पदरात घेणाऱ्या शेतकऱ्यांचे जगणे धोक्यात आले आहे. वन विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे. याचदिवशी सकाळी प्रदीप गावडे हे याच परिसरातील त्यांच्या शेतात गहू व हरभरा काढण्यासाठी महिला मजूर घेऊन आले असता, रिकाम्या शेतामध्ये दोन बिबटे बसल्याचे त्यांना आढळले होते. ऊसशेतात बिबट्याने अधिवास केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पिके, शेतवस्ती, पशुधन असल्याने शेतकऱ्यांना दररोज शेतात यावेच लागते. शेतवस्तीतील बिबट्याचा वावर हा खूपच चिंताजनक बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT