Ravindra Chavan Pudhari
सांगली

Ravindra Chavan| भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सांगली दौऱ्यावर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठक घेणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज-गुरुवार, दि. १५ रोजी सांगली दौऱ्यावर येत आहेत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठक घेणार आहेत. सकाळी ९.३० वाजता सांगलीतील हॉटेल आयकॉन इन येथे ही बैठक होणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची तयारी, संघटनात्मक नियोजन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे गुरुवारी सकाळी मुंबईहून विशेष विमानाने कोल्हापूर येथे आगमन होणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते कवलापूर हेलिपॅडवर दाखल होतील. तेथून मोटारीने हॉटेल आयकॉन इन येथे सकाळी ९.३० वाजता येतील. तेथे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक आढावा बैठक होणार आहे. बैठकीनंतर दुपारी १.३० वाजता ते मोटारीने कवलापूर हेलिपॅडकडे प्रयाण करतील. तेथून हेलिकॉप्टरने पलावा, डोंबिवलीकडे रवाना होतील.

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजप महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव, तर शिक्षक मतदारसंघातून भाजप महायुतीचे कौस्तुभ गावडे उमेदवार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यामुळे निवडणूक तयारी, नियोजन व प्रचाराला गती आली आहे. या बैठकीत प्रचाराची पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे. मतदारांशी संपर्क वाढवणे, पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करणे आणि प्रचारयंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यामुळे निवडणूक प्रचाराला नवी उर्जा मिळणार आहे. पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना सांगली जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT