सांगली : येथील माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा सहकारी औद्योगिक वसाहतीमधील अनिश्का इंडस्ट्रिज या हळदीपासून भंडारा तयार करण्याच्या कारखान्यात शनिवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी कारखान्यात जवळपास कोणीही नव्हते, त्यामुळे जीवित हानी टळली. या स्फोटात कारखान्याचे छत उडाले.
वसंतदादा औद्योगिक वसाहतीमध्ये अनिश्का इंडस्ट्रीज आहे. यामध्ये हळदीपासून भंडारा तयार केला जातो. गॅसवर तेल ठेवून उकळण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेवेळी तिथे कोणी कामगार उपस्थित नव्हते. तेल जास्त प्रमाणात उकळल्याने त्याचा भडका उडाला असावा, सिलिंडरच्या पाईपमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.