सांगली

मिरज : बँक कर्मचार्‍यांकडून ग्राहकांना 35 लाखांचा गंडा

दिनेश चोरगे

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  शहरातील एका बँकेतील कर्मचार्‍याने ग्राहकांच्या क्रेडिट कार्डमधून 15 ते 20 ग्राहकांची सुमारे 35 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी एका ग्राहकाने भरत अशोक कोळी या कर्मचार्‍याविरोधात महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, भरत हा मिरजेतील एका बँकेत कर्मचारी आहे. त्या बँकेत खाते असणार्‍या 15 ते 20 ग्राहकांना त्याने क्रेडिट कार्ड दिले होते. ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर येणारा ओटीपी क्रमांकाची माहिती घेऊन भरतने त्यांच्या क्रेडिट कार्डवरून रक्कम परस्पर काढून घेतली होती.

क्रेडिट कार्डचा वापर करून देखील पैसे भरले जात नसल्याने बँकेतून संबंधित ग्राहकांना पैसे भरण्यासाठी वारंवार फोन करण्यात येत होते. तरीदेखील पैसे भरले जात नसल्याने बँकेतून ग्राहकांना तगादा लावला होता. याबाबत ग्राहकांनी बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर त्याच्या क्रेडिट कार्डवरून रक्कम परस्पर हडप केल्याचे उघड झाले.

SCROLL FOR NEXT