सांगली

जत : आमदार पडळकरांवरील हल्ल्याचा ओबीसी समाजाकडून निषेध; विजापूर-गुहागर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

backup backup

जत; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा जत येथे समाजकंटकाचा जाहीर निषेध करण्यात आला. सकल ओबीसी समाजाच्या वतीने विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग महाराणा प्रताप चौक येथे काही काळ रास्ता रोको करण्यात आला होता. जत येथे या भ्याड हल्लाचा निषेध करण्यात आला.तसेच हल्लेखोर यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना देण्यात आले.

या आंदोलनात ओबीसी नेते अशोक बन्नेनवार,भाऊसाहेब दुधाळ,तुकाराम माळी, सलीम गवंडी, दिनकर पतंगे, आण्णा भिसे ,आप्पा मासाळ,लक्ष्मन जखगोंड, राम पाटील ,अनिल पाटील, बाळासाहेब पांढरे ,तानाजी कटरे आदी सहभागी झाले होते.

या तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इंदापूर येथे काही समाजकंटकांनी आ. पडळकर यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा ओबीसी समाजाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे .तसेच हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कडक कारवाई करावी. तसेच विविध ठिकाणी ओबीसी नेत्यावर हल्ले होऊ लागले आहे. अश्या घटनेमुळे दौऱ्यावर असलेल्या ओबीसी नेत्यांना धोका निर्माण होत आहे. लोकशाहीच्या मूल्यांना काही लोक पायदळी तुडवत आहेत. तरी सरकारने ओबीसी नेत्यांच्या सुरक्षिततेत वाढ करावी अन्यथा असे हल्ल्यांना आम्हीही जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकतो असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

दरम्यान या हल्ल्याचा बेवनुर (ता.जत) येथे जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी गाव कडकडीत बंद ठेवून टायरी पेटवून निषेध करण्यात आला. यावेळी मारुती सरगर, संभाजी बंडगर, माजी चेअरमन पारेकर, दसरथ बंडगर, समाधान गायकवाड, शिवप्रताप शिंदे आदी उपस्थित होते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT