Water Scarcity Pudhari
सांगली

Sangli News| आटपाडीत ५ रोजी शेतकरी मोर्चा

पाणी संघर्ष चळवळ तहसील कार्यालयावर धडकणार

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी तालुक्यात पाण्याचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असून जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी नसल्याने शेतातील पिके वाळू लागली असून त्यातच शेतीपंपांना होणारा खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर घालत आहे. टेंभू योजनेचे पाणी उपलब्ध असतानाही ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि 'पाणी संघर्ष चळवळी'च्या पुढाकाराने सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे. गावागावांत तसेच वाड्या-वस्त्यांवर बैठका घेऊन शेतकरी व नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. दुष्काळी भागातील जनतेच्या या ज्वलंत मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात येत आहे.

सोमवार, दि. ५ रोजी सकाळी ११ वाजता आटपाडी बसस्थानकापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, शिवाजीराव काळुंगे, गौरव नायकवडी, आनंदराव पाटील, भारत पाटील व हणमंतराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे.शासनाने आता केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पाणी संघर्ष चळवळ व शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT