मृत ऋतुजा  
सांगली

Sangli Crime : अनुजाच्या मदतीला धावले शिक्षक आणि कर्मचारी

उपचार, तसेच भविष्यासाठी 80 हजारांची मदत

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे घडलेल्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत एका चिमुरडीचा जीव गेला, तर दुसरी गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर शिक्षक आणि पंचायत समितीच्या शिक्षकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली.

या घटनेतील जखमी अनुजा (वय 11) हिच्यावर आटपाडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही बहिणी बनपुरी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 मध्ये शिक्षण घेत होत्या. आपल्या विद्यार्थिनींवर आलेल्या या संकटाचा धक्का शिक्षकांनाही बसला आहे. यानंतर आटपाडी तालुक्यातील शिक्षकांनी व पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तब्बल 80 हजार रुपयांचा निधी तिच्या उपचार आणि भविष्यासाठी उभा केला. ही मदत केवळ आर्थिक नसून, अनुजाच्या आयुष्यात आशेचा किरण ठरणारी आहे. समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे, विस्तार अधिकारी जगन्नाथ कोळपे आणि अन्य शिक्षकांच्या उपस्थितीत ही मदत अनुजाचे आजोबा हैबती यमगर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यासोबतच अनुजाच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक साहित्य व कपड्यांचीही व्यवस्था करण्यात आली.

‌‘विद्यार्थी म्हणजेच आपले कुटुंब‌’

शिक्षक व मान्यवरांनी दाखवलेली ही एकजूट केवळ मदतीपुरती मर्यादित नसून, “विद्यार्थी म्हणजेच आपले कुटुंब” ही भावना प्रत्यक्ष कृतीतून जिवंत करणारी आहे. या घटनेने जरी दु:खाची सावली पसरली असली, तरी शिक्षकांच्या या मायेच्या स्पर्शाने मानवतेचा विश्वास पुन्हा दृढ केला आहे. संकटाच्या काळात उभा राहणारा हातच खऱ्याअर्थाने नात्यांची किंमत सांगून जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT