stray dog pudhari photo
सांगली

Sangli News : आष्ट्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या बालकासह सहाजण गंभीर जखमी

शहरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : आष्टा शहरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा वाढला असून, बुधवारी सायंकाळी मटण मार्केट चौक परिसरातील सुतार गल्ली, पोळ गल्ली आणि मुस्लिम मोहल्ला परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यात दोन वर्षांच्या बालकासह सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.

या हल्ल्यात महंमद रफीक शेख (वय ३), सैफ सादिक नायकवडी (वय ३५), रहान शाबास नायकवडी (वय २) आणि भक्ती सुरेश कदम (वय १७) यांच्यासह अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या ​घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक शकील मुजावर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, नगरसेवक नंदकुमार बसुगडे, सचिन घस्ते, माजी नगरसेवक शकील मुजावर यांनी जखमींची ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.

अवघ्या महिनाभरापूर्वीही शहरात अशाच प्रकारे कुत्र्यांच्या हल्ल्यात एका नगरसेवकासह आठजण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी नगरपालिकेने कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली होती, परंतु ती अर्धवट सोडण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT