आष्टा पालिकेच्या मच्छी मार्केटची दुरवस्था 
सांगली

Sangli News : आष्टा पालिकेच्या मच्छी मार्केटची दुरवस्था

कोट्यवधींचे साहित्य लंपास, प्रशासन अन्‌‍ सत्ताधारी सुस्त

पुढारी वृत्तसेवा

उत्तम कदम

आष्टा : अत्याधुनिक मच्छी मार्केट म्हणून ज्याचा गाजावाजा झाला, ते आष्ट्याचे मच्छी मार्केट आज प्रशासकीय नाकर्तेपणा आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. राष्ट्रीय मत्स्यविकास महामंडळाच्या 1 कोटी 75 लाखांच्या निधीतून उभारलेली ही देखणी इमारत आज केवळ एक सांगाडा उरली आहे. कोट्यवधींचे साहित्य चोरीला जाऊनही प्रशासन आणि सध्याचे सत्ताधारी कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

या ठिकाणी 48 सुसज्ज गाळे आणि माशांच्या लिलावासाठी मोठा हॉल, मासे ताजे राहण्यासाठी शीतगृह आणि आईस फ्लेक्स मशीन. स्वच्छतेसाठी प्रत्येक गाळ्यात पाण्याची सोय आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा ई.टी.पी.प्लांट, परंतु आजची स्थिती काटा आणणारी आहे. या मार्केटमधील शीतगृह गायब झाले आहे, आईस फ्लेक्स मशीन चोरट्यांनी लंपास केले आहे, खिडक्यांच्या जाळ्या, नळ आणि विजेचे साहित्यही आता शिल्लक नाही. 1 कोटी 75 लाख रुपये पाण्यात गेल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. इमारतीमध्ये व सभोवती घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

शासनाच्या पैशाची ही लूट असून, झालेल्या नुकसानीची भरपाई तत्कालीन प्रशासक आणि सध्याच्या सर्व नगरसेवकांच्या खिशातून वसूल करण्यात यावी. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT