Leopard Sighting Pudahri
सांगली

Sangli News : आष्ट्यात मिरजवाडी रोड परिसरात बिबट्याचा वावर

नागरिकांमध्ये भीती, पिंजरा लावण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : येथील मिरजवाडी रोडवरील हालुंडे मळा आणि लाळगे मळा परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष विशाल शिंदे व गटनेते झुंझारराव पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून, 'प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून घाबरून जाऊ नका,' असा दिलासा दिला. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यानंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याची व आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना दिली.

यावेळी दत्तात्रय मस्के, रंजना वीरभक्त, अभिजित भोपे, जिनपाल हालुंडे, जितेंद्र खोत, संदीप हालुंडे, सुहास हालुंडे, अंकुश वारे, उत्कर्ष माने, सुहास पाटील, बाहुबली हालुंडे आणि संदीप मगदूम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT