Land fraud file photo
सांगली

Sangli Land Fraud : जमीन खरेदीच्या बहाण्याने ७ लाखांची फसवणूक

आष्टा येथील घटना; दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : भावाचे लग्न, कौटुंबिक खर्च आणि लोकांचे देणे फेडण्याच्या बहाण्याने जमिनीचे गहाण स्वरूपात मुदत खरेदी पत्र करून देत ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक विलास सपकाळ आणि अमित पवन कोळी (दोघे रा. आष्टा) अशी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी सुदेश संजय भोळे (वय ३३, रा. चव्हाणवाडी, आष्टा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी २०२५ ते १८ जून २०२६ या कालावधीत संशयितांनी आपापसांत संगनमत करून सुदेश भोळे यांचा विश्वास संपादन केला. संशयित विनायक सपकाळ याने वैयक्तिक कारणांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून, त्याबदल्यात मर्दवाडी येथील गट नंबर १२७/१४/२३/१ ब मधील ०.२० आर शेतजमीन 'गहाण स्वरूपी मुदत खरेदी' देण्याचे आश्वासन दिले. या विश्वासावर भोळे यांनी संशयितांना वेळोवेळी ऑनलाइन, चेकद्वारे व रोखीने असे एकूण ७ लाख रुपये दिले. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी या व्यवहाराबाबत नोटरीही करण्यात आली होती.

मात्र, पैसे घेतल्यानंतर संशयितांनी जमिनीचा ताबा भोळे यांना दिला नाही. उलट, तीच शेतजमीन परस्पर राहुल रघुनाथ जाधव (रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) यास पुन्हा गहाण स्वरूपात मुदत खरेदीपत्र करून देऊन सुदेश भोळे यांची ७ लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT