विटा; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभेबाबत शिंदे गटाच्या भूमिके बाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, परंतु कुठल्याही पक्षाला कमीपणा येईल असे काही ही होणार नाही, अशी संदिग्ध प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे लोकसभेबाबत शिंदे गटाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी आज शनि वारी आमदार अनिलराव बाबर यांची सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी खासदार संजय पाटील उपस्थित होते. पत्रकारांनी यावेळी केसरकर यांना राज्यात लोकसभेच्या 45 च्या वर जागा जिंकण्याची भाजपचे उद्दिष्ट आहे, याबाबत छेडले असता, केसरकर म्हणाले, राज्यात आम्ही आणि भाजप एकत्र आहोत आता अजितदादा ही आम्हाला मिळाले ले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
सांगली लोकसभेबाबत शिंदे गटाची भूमिका काय या प्रश्नावर मात्र खासदार संजय पाटील यांच्या समोरच मंत्री केसरकर म्हणाले, हे निर्णय आमच्या पातळीवर होत नाहीत. बोलताना काय कोणी काहीही बोलतो.पण आमची युती भक्कम आहे. काही निर्णय दिल्ली च्या, वरिष्ठ पातळीवर होतात. सांगली लोकसभेबाब त शिंदे गटाच्या भूमिकेबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेजण एकत्र बसून निर्णय घेतील. परंतु कुठल्याही परिस्थितीत कुठलीही पक्षाला कमीपणा येईल असे काहीही होणार नाही असे उत्तर केसरकर यांनी दिले. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत विचारले असता तुम्हाला झाल्यानंतर कळणारच ना? असे उत्तर दिले.
यावेळी आमदार बाबर यांना संधी मिळणार का याबाबत थेट विचारले असता मंत्री केसरकर यांनी आमदार बाबर हे आमच्या मंत्रिमंडळातले सर्वात जास्त महत्त्वाचे सदस्य आहेत. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता कामाच नये. त्यांनी पाण्याबाबत जी लोकांची समस्या सोडवून काम केले आहे ते फार मोठे आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदा पेक्षा दुसरा कुठला पर्याय असेल असे मला व्यक्तिशः वाटत नाही, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.