सांगली

माझी सर्व ताकद वैभव पाटलांच्या पाठीशी उभी करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

backup backup

विटा; पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याबरोबर माझी विस्तृत चर्चा झाली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मला चांगले माहीत आहेत. वैभव पाटलांचा काम तुम्हाला आणि मला सर्वांना चांगलं माहित आहे वैभव पाटलांना मी कदापी अंतर देणार नाही माझी सर्व ताकद वैभव पाटलांच्या पाठीशी उभी करीन, अशी निःसंधिग्ध ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली.

कोल्हापूर येथे होणाऱ्या उत्तरदायित्त्व सभेसाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग चार वरील केदारवाडी फाटा येथे अॅड वैभव पाटील यांनी अजितदादा पवार यांच्या आयोजित केलेल्या सत्कार आणि स्वागत समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अॅड. वैभव पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यासह उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे जंगी स्वागत केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT