सांगली

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अखेर जतमधील कार्यकर्त्यांचा मोठा निर्णय! सर्व पदाधिकारी ‘या’ नेत्यासोबत | Jath NCP

backup backup

जत; पुढारी वृत्तसेवा : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असले तरी जत तालुक्यातील राष्ट्रवादी भक्कमपणे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम आहे. तसेच तालुक्यात आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी आणखी भक्कम करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक रमेश पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. तशा प्रकारचा ठराव प्रदेश काँग्रेसकडे पाठवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमवारी एकीकडे अजित पवार गटाने जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याचे समजल्यानंतर जतमध्ये या घटनेचा राष्ट्रवादीने निषेध नोंदवला. शिवाय जतची अखंड राष्ट्रवादी शरद पवार व जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचा सूर बैठकीत आ. जत येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या पत्रकार बैठकीत याबाबतची माहितीही दिली.

यावेळी माजी सभापती सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, ॲड. चन्नाप्पा होर्तीकर, उत्तम चव्हाण बसवराज धोडमणी, मीनाक्षी अक्की, प्रतापराव शिंदे, मच्छिंद्र वाघमोडे, अण्णासाहेब कोडग, लक्ष्मण कोडग, शफीक इनामदार, श्रीमती अलगूर, बाजी केंगार, पप्पू शिंदे, प्रा. कद्रे, अमरसिंह डफळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष रमेश पाटील म्हणाले, अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या विरोधात आहे त्यामुळे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना हा निर्णय पटलेला नाही. ज्या शरद पवार यांनी अखंड हयात घालवून पक्ष उभा केला. अनेकांना वेगवेगळ्या पदांचा सन्मान दिला. तरुणांची नवी टीम तयार केली त्यांना सोडून जाणे उचित नाही. आम्ही तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा एकमुखी निर्णय घेतलेला आहे. तालुक्यात जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांचे विचार घरोघरी पोहोचवणार आहे.

SCROLL FOR NEXT