उद्घाटनानंतर पुलावर काही वेळातच अपघात  
सांगली

Sangli News : उद्घाटनानंतर पुलावर काही वेळातच अपघात

पदपथाच्या बाजूला असणार्‍या कट्ट्यावर कार धडकली आणि नवीन कट्टा फुटला

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः येथे कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी प्रशासन आणि भाजप नेत्यांकडून स्वतंत्ररीत्या मोठ्या थाटामाटात झाला. पण, उद्घाटनानंतर काही वेळातच सायंकाळी नव्या पुलावर अपघात झाला. पुलावरील पदपथाच्या बाजूला असणार्‍या कट्ट्यावर एक कार धडकली आणि नवीन कट्टा फुटला.

आयर्विन पुलाला समांतर पूल उभारण्यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला. त्यापूर्वी जुन्या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर नवीन पुलाचे काम सुरू झाले. कोट्यवधीचा निधी खर्च करून हा पूल उभारण्यात आला. दरम्यान, कंत्राटदाराचे बिल थकल्याने त्याने काम थांबवले होते. अखेर गुरुवारी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले व तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

दरम्यान, सायंकाळी पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर तासाभरातच या पुलावर एक वृद्ध कार घेऊन आले. त्यांना पदपथाशेजारी असणार्‍या कट्ट्याचा अंदाज आला नाही. पुलावर अंधार असल्याने त्यांची कार कट्ट्याला जाऊन धडकली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. नवीन पुलावर उद्घाटनानंतर तासातच हा अपघात झाल्याने चर्चेला उधाण आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT