मारहाणीत जखमी झालेल्या उषा सुर्यवंशी Pudhari Photo
सांगली

धनगावात भरदिवसा घरात घुसून महिलेला मारहाण; दागिने लुटले

पुढारी वृत्तसेवा

भिलवडी : पुढारी वृत्तसेवा

घरात घुसून महिलेला बेदम मारहाण करून तिच्याकडून दागिने हिसकावून घेण्यात आले. धनगावात सोमवारी सकाळी ही घटना घडली. उषा सुरेश सूर्यवंशी (वय 34, रा. हजारवाडी-धनगाव, ता. पलूस ) असे गंभीर जखमी महिलीचे नाव आहे. पती सुरेश शुक्राचार्य सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली.

धनगावमध्ये सलग तिसर्‍या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे भिलवडी पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. उषा या सकाळी कपडे धूत होत्या. त्यांच्या घरात अन्य कोणी नव्हते. त्यांच्यावर दोघा चोरट्यांनी हल्ला केला. कर्णफुले व गळ्यातील दागिने काढून पोवारा केला. या झटापटीमध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या भेदरून गेल्या होत्या. त्यांनी आरडा-ओरडा केला. त्यामुळे शेजारील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

यावेळी हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. मिळालेल्या माहितीनुसार लाल पिशवी घेतलेला दाढीवाला पुरूष आणि त्याच्या समवेत एक महिलाही असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यावेळी नागरिकांनी उषा यांना भिलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. त्यांना मानसिक धक्का बसला आहे. घटनेनंतर त्या दीड तास बेशुद्ध होत्या. त्यांना डोक्याच्या उजव्या बाजूला मार लागल्याने मोठी जखम झाली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करणे चालू होते. पोलिसांनी पथक निर्माण करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT