Special Railway will Connect Between Banglor to Pandharpur
बंगळूर ते पंढरपूर विशेष धावणार Pudhari File photo
सांगली

बंगळूर ते पंढरपूर विशेष रेल्वे धावणार

पुढारी वृत्तसेवा

मिरज : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून बंगळूर ते पंढरपूर दरम्यान चार विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहेत. बंगळूर-पंढरपूर-बंगळूर दरम्यान या विशेष एक्स्प्रेसच्या एकूण आठ फेर्‍या होणार आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.

बंगळूर-पंढरपूर-बंगळूर विशेष एक्सप्रेस दि. 26, 28 आणि 29 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बंगळूरहून सुटेल आणि पंढरपूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. हीच गाडी परतीच्या प्रवासात पंढरपूर येथून सायंकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी बंगळूर येथे 11.30 वाजता पोहोचेल. तर बंगळूरहून 30 जून रोजी सुटणारी गाडी रात्री 10 वाजता सुटेल.

दुसर्‍या दिवशी दुपारी 4.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. ही गाडी परतीच्या प्रवासात 1 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी बंगळूर येथे सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. या गाडीच्या जाता-येता आठ फेर्‍या होणार आहेत. त्यामुळे कर्नाटकातून पंढरपूरला जाणार्‍या भाविकांची सोय होणार आहे.

SCROLL FOR NEXT