इस्लामपूर : पोलिसपदी निवड झालेला पंकज पाटील, एसआरपीमध्ये निवड झालेले बाबू शेख व विनायक पाटील यांचा सत्कार करताना माजी नगरसेवक शिवाजी पवार, अ‍ॅड. विजय काईंगडे, विनायक जाधव आदी. Pudhari Photo
सांगली

इस्लामपुरातील पेपरविक्रेता झाला पोलिस

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : सुनील माने

घरची परिस्थिती गरिबीची. सकाळी वृत्तपत्र वाटून दिवसभर दुसर्‍या ठिकाणी काम करून येथील पेपरविक्रेता पंकज अशोक पाटील याने जिद्द व कष्टाने पोलिस पदापर्यंत झेप घेतली आहे. त्याची पोलिसपदी निवड झाल्यावर आई-वडील व बहिणीने आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. पोरानं कष्टाचं चीज केलं, असे म्हणत आईने पंकजच्या गालावरून मायेने हात फिरविला.

पंकजचे आई-वडील शेती करतात. शेती करतच मुलांच्या शिक्षणाकडे पंकजच्या वडिलांनी लक्ष दिले होते. पंकज हा सकाळी शहरात पेपर वाटण्याचे काम करत होता. त्यानंतर दिवसभर दुसरे काम करून आणि खेळ व शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले होते. पहिल्यापासून पंकजला हॉकीची आवड आहे. तो येथील वाळवा शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असून संस्थेचे सचिव अ‍ॅड. बी. एस. पाटील व सहसचिव अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शखाली कॉलेजच्या पटांगणावर हॉकीचे धडे घेत आहे. पंकजने हॉकीच्या अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत.

त्याने राष्ट्रीय स्तरापर्यंत हॉकीमध्ये नाव गाजविले. राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याने ओळख निर्माण केली आहे. यशोधन फाऊंडेशनचे संस्थापक व माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी हॉकी खेळात तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पहिल्यापासूनच सर्वकाही मदत केली. रवी बावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि तो महाराष्ट्र पोलिस पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT