सांगली

सांगली : जत तालुक्यात तरुणाची फोन पे वरून तीन लाखाची फसवणूक

backup backup

जत; पुढारी वृत्तसेवा : जत येथील एका तरुणास फोन पे कस्टमर केअरचा प्रतिनिधी आहे असे सांगून कॉल वरून तुमचे फोन पे अपडेट करायचा आहे. असे सांगून ओटीपी मागून घेतला. नंतर ३ लाख ३१ हजार ९९९ रुपये बँकेतून परस्पर ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. संबंधित संपर्क क्रमांकावर संपर्क साधून ही परत पैसे देत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. संबंधित व्यक्तीने जत पोलीस ठाण्यात धाव घेतली व अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीची गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ व२६ ऑगस्ट रोजी घडली आहे. त्या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी जत तालुक्यातील एका व्यावसायिकास दि २५ ऑगस्ट रोजी ६२८९१२२२८२ या क्रमांकावरून कॉल आला होता. यावेळी फोन पे केअरचा प्रतिनिधी असल्याचं सांगत माहिती विचारून घेतली. वेगवेगळे ऑप्शन दाबण्यास सांगितली .यानंतर खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. तदनंतर या कॉलवर संपर्क साधला असता तुम्हाला पहिले पैसे मिळवून देऊ असे सांगत ही दुसऱ्या दिवशीही २६ ऑगस्ट रोजी १ लाख९९९ रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर झाले. संबंधित व्यक्तीच्या खात्यातून ऑनलाइनमधून ट्रान्सफर झालेली रक्कम ३ लाख ३१ हजार ९९९ रुपयेची फसवणूक झाली आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास जत पोलीस करत आहे.

SCROLL FOR NEXT