जत : शहरातील शंकर कॉलनी येथील वसीम जहांगीर शेख (वय 35) यांची स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवत तब्बल 8 लाख 69 हजाराची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुमित संपत गायकवाड, संपत बाबुराव गायकवाड, सुनीता संपत गायकवाड, नीशा रमेश गायकवाड, अक्षय मधुकर हसबे (सर्व रा. रोहिणी ज्वेलर्स, दिघी, परांडेनगर, पुणे) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जून 2022 ते 19 डिसेंबर 2022 या कालावधीत संशयितांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून ‘स्वस्तात सोने देतो’ असा विश्वास दिला. त्यानुसार फोन-पे आणि रोखीने रक्कम घेतली. मात्र सोने दिले नाही. फिर्यादीने रकमेची मागणी केल्यावर ‘पैशाची कोठे वाच्यता केली तर जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. याबाबत शेख यांनी जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.