सांगली

सांगली : नोकरीच्या आमिषाने सात तरुणांना 32 लाखांचा गंडा

Arun Patil

सांगली, वृत्तसेवा : तलाठी तसेच अन्य शासकीय विभागात नोकरीचे आमिष दाखवून सात सुरशिक्षित बेरोजगार तरुणांना 32 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी कवलापूर (ता. मिरज) येथील अक्षरदीप शिक्षण संस्था या ट्रस्टचा अध्यक्ष वैभव अण्णासाहेब बंडगर याच्याविरुद्ध विश्रामबाग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल बाळासाहेब ओमासे, अश्विनी बाळासाहेब ओमासे, अभिजित वामन खाडे, शीतल तानाजी हुलवान, सचिन रामचंद्र डोंबाळे, अनिकेत उत्तम सांगळे, हणमंत गोविंद चंदनवाले या तरुणांची फसवणूक झाली आहे. याबाबत अयुल ऊर्फ सागर सुरेश ओमासे (वय 30, रा. पंचशीलनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली .

मार्च ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. संशयित बंडगर याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तलाठी यासह अन्य शासकीय विभागात नोकरीचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून सांगलीत वेळोवेळी 32 लाख रुपये स्वीकारले. पैसे घेऊन एक वर्षाचा कालावधी होत आला तरी बंडगर याने एकाही तरुणाला नोकरी लावली नाही. तरुणांनी पैशाची मागणी केली. त्यावेळी त्याने नकार दिला. तरुणांनी पैसे देण्याची मागणी केली. पण तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे फसगत तरुणांनी सोमवारी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

SCROLL FOR NEXT