Police Officers Transfer 
सांगली

Police Officers Transfer : जिल्ह्यातील 19 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पाचजणांची जिल्ह्यात नियुक्ती : दोन अधिकाऱ्यांना मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : कोल्हापूर परिक्षेत्रात पोलिस दलात मोठे बदल करण्यात आले असून अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 19 पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत, तर पाच अधिकाऱ्यांची जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक, सहा. निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या बदल्या या प्रशासकीय कारणास्तव तसेच त्यांच्या विनंतीनुसार करण्यात आल्या आहेत.जिल्ह्याबाहेर बदली झालेल्यांमध्ये पोलिस मुख्यालयात कंट्रोलला नियुक्ती असणारे पोलिस निरीक्षक संजय आकाराम हारूगडे यांची सांगलीतून कोल्हापूरला, तर प्रदीप बाळासाहेब सूर्यवंशी यांची सांगलीतून साताऱ्याला बदली करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चार सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक निरीक्षक आण्णासाहेब वसुदेव गादेकर यांची सांगलीतून पुणे ग्रामीणकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सिकंदर विष्णू वर्धन यांची सांगलीतून सोलापूर ग्रामीण, राजेश जोतिबा माने यांची सांगलीतून सातारा, तर अभिजित जयसिंग कुदळे यांची सांगलीतून पुणे ग्रामीण येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तब्बल 13 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तेजस्विनी रामचंद्र पाटील, इकबाल गुलाब महात, प्रियांका अभिजित खाडे, मृणालिनी कलगोंडा पाटील, संजीव भाऊसाहेब जाधव, राजू श्रीकांत अन्नछत्रे, श्रीकांत मोहन वासुदेव, प्रमोद प्रकाश खाडे, दीपक आनंद माने यांची सांगलीतून कोल्हापूर जिल्ह्यात, संदीप नामदेव गुरव, सागर मच्छिंद्र गायकवाड, केशव शंकर रणदिवे यांची सांगलीतून सोलापूर ग्रामीण आणि नीलम मदनराव जाधव यांची सांगलीतून सातारा जिल्ह्यात बदली झाली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक निभावरी नारायण रेळेकर यांची सोलापूर ग्रामीणमधून सांगलीत आणि सरिता सोपान जाधव यांची साताऱ्यातून सांगलीत बदली करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रणोती रघुनाथ यादव, पोपट विलास काशीद यांची सोलापूर ग्रामीणमधून सांगलीत आणि प्रियांका दशरथ माने यांची पुणे ग्रामीणमधून सांगलीत बदली करण्यात आली आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक रूपाली भाग्यवंत गायकवाड आणि जयश्री आबासाहेब कांबळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT