सांगली : झिरोपेमेंट न केल्याप्रकरणी 15 बेदाणा व्यापार्यांना सौद्यात बेदाणा खरेदीवर बंदी घातली आहे. दिवाळी सुटीनंतर पुन्हा गुरुवारपासून सांगली मार्केट यार्डात बेदाणा सौदे सुरू होणार आहेत.दरम्यान, झिरोपेमेंट न केलेल्या संबंधित व्यापार्यांची आज नावे जाहीर केली जाणार असल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.
शेतकरी आणि अडत्यांची फसवणू होऊ नये, यासाठी बेदाणा असो. आणि बाजार समितीच्यावतीने झिरोपेमेंट ही पध्दत सुरू केली आहे. वर्षभर खरेदी केलेल्या बेदाण्याचा हिशेब दिवाळीपूर्वी पूर्ण केला नाहीतर दिवाळीनंतर होणार्या सौद्यात संबंधित थकीत खरेदीदाराला सौद्यात बंदी आणला जाते. यावर्षीचे दिवाळीनंतरचे सौदे शुक्रवारपासून यार्डात सुरू होणार आहेत. मात्र 15 खरेदीदारांनी अद्याप मागील हिशेब पूर्ण केला नाही. या खरेदीदारांना हिशेब पूर्ण करण्याबाबत बेदाणा असोसिएशन आणि बाजार समितीने सांगूनही हिशेब पूर्ण केला नाही. त्यांनी तत्काळ हिशेब पूर्ण करावा, अन्यथा त्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून खराब वातावरणामुळे द्राक्ष पिकाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादनही कमी प्रमाणात झाले आहे. उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर तासगाव येथे गुरुवारी निघालेल्या सौद्यात प्रति किलोस 360 ते 400 रुपये दर मिळाला.