अलिबाग; रमेश कांबळे : अंगणवाडी सेविकांना दररोजच्या कामाची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी केंद्र शासनाकडून पोषण टॅकर हे नवीन अॅप आणले आहे. इंग्रजी भाषेत माहिती भरताना, अंगणवाडी सेविकांना समस्या येत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने अॅपमध्ये मराठी भाषा वापरता यावी. अशी मागणी केली होती. त्यानुसार मराठी भाषेत ॲप सुरू झाल्याने अंगणवाडी ताईची चिंता मिटली आहे.
इंग्रजी भाषेत अॅप असल्याने माहिती इंग्रजीतच भरावी लागत असे. अंगणवाडीताईंच्या मागणीनुसार मराठीत अॅप विकसित केल्याने माहिती मराठीत भरता येणार आहे. पोषण आहार अॅपवर अंगणवाडी सेविकांनी स्वतःचे नाव तेवडे इंग्रजी भाषेत लिहायचे आहे. अन्य माहिती मराठी भाषेत लिहता येणार आहे.
जिल्ह्यात तिन हजार २५५ अंगणवाड्या असून, १ लाख ५४ मुले पूर्व प्राथमिक शिक्षणाचा धडा गिरवतात.अंगणवाडी सेविकांना नवीन अॅपमुळे दैनंदिन अहवाल मराठी भाषेत सादर करणे सुलभ होणार आहे.
जिल्ह्यात दोन हजार ४३४ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी मदतनिसांची संख्या २ हजार ११५ इतकी आहे. मराठी भाषेतील अँपमुळे गैरसोय झाली आहे.
पोषण टॅकरला इंग्रजी भाषेमुळे विरोध होत होता. कारण ताईचे शिक्षण फारसे नसते, विरोध वाढल्यानंतर शासनाकडून पोषण टॅकर मराठी भाषेत उपलब्ध करून दिले. मात्र, नाव लिहिण्यासोबतच काही बाबींचा उल्लेख इंग्रजीमध्येच करावा लागतो आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत अडचणी कमी झाल्या असल्या तरी १०० टक्के दूर झाल्या नसल्याचे अंगणवाडी ताईचे म्हणणे आहे. दरम्यान या मागणीकरिता अंगणवाडी ताईंनी राज्यभरात मोठे आंदोलन केले होते.
अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामाचा ऑनलाइन अहवाल सादर करण्यासाठी केंद्र शासनाने पोषण ट्रैकर अँप २०२० मध्ये कार्यान्वित केले. अँप इंग्रजी भाषेत असल्याने माहिती इंग्रजीत भरावी लागत असे.