farmers news
बळीराजाच्या उन्नतीसाठी जेएनपीएचा पुढाकार file photo
रायगड

बळीराजाच्या उन्नतीसाठी जेएनपीएचा पुढाकार

पुढारी वृत्तसेवा
उरण : राजकुमार भगत

जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण (जेएनपीए) कृषी मालावर आधारीत प्रक्रिया आणि साठवणूक केंद्र उभारणार असून केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीएच्या प्रस्तावाला नुकतीच 19 जुलै 2024 रोजी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 285 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. अशा प्रकारची देशातील बंदरांमध्ये जेएनपीएने पहिल्यांदाच अशी सुविधा असणार आहे.

  • उत्पादन ताजेपणा आणि दर्जेदार प्री-कूलिंग: सुविधा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे तापमान व्यवस्थापन सुनिश्चित करणे.

  • फ्रोझन स्टोरेज: पोत, चव आणि पौष्टिक मूल्य टिकवून ठेवण्यासाठी डीप फ्रीझ परिस्थिती आवश्यक असलेल्या वस्तूंना सामावून घेण्यासाठी धोरण.

  • ड्राय वेअरहाऊस: नाशवंत वस्तूंसाठी सुरक्षित स्टोरेज सोल्यूशन्स प्रदान करणे, त्यांचे पर्यावरणीय घटकांपासून संरक्षण करणे.

प्रगत तंत्रज्ञान आणि कार्यक्षम प्रक्रिया आणि जतन तंत्रांसह, सुविधा कापणीनंतरचे नुकसान लक्षणीयरीत्या कमी करणार आहे. यासाठी अंदाजे 285 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर उभारण्यात येणार आहे. तसेच जेएनपीए रस्त्यावर अवैध वाहने उभी करणार्‍या वाहनांवर जेएनपीए आत्ता कडक धोरण राबविणार असून या वाहन धारकांचा जेएनपीएतील परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे जेएनपीएच्या जागांवर जी अवैध बांधकामे झाली आहेत ती बांधकामे देखिल 15 ऑगस्ट नंतर तोडण्यात येतील असे जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी सांगितले. तर जेएनपीएची नव्याने आणखी एक कोस्टल रोड बनविण्याची योजना असून बेलपाडा गावाच्या पाठीमागून ते अटल सेतू पर्यंत हा मार्ग बनविण्यात येणार आहे.

असे असेल सुविधा केंद्र

27 एकर जागेवर प्रस्तावित सुविधा नियोजित असून हे प्रक्रिया, वर्गीकरण, पॅकिंग आणि प्रयोगशाळा सुविधांसह सर्वसमावेशक सेवा प्रदान करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे, अन्न सुरक्षा आणि व्यापार नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेवर जोर देते. हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या इतर राज्यांच्या कृषी मालाची पूर्तता करेल.

मंत्रालयाने ’बंदराच्या नेतृत्वाखालील विकास’ आणि जनेपप्राच्या ’पोर्टच्या माध्यमातून औद्योगीकरणाच्या प्रयत्नांबद्दल मांडलेल्या अभियानाचे अनुसरण करून आम्ही कृषी आधारीत आयात- निर्यात मालावर प्रक्रिया आणि साठवण सुविधा विकसित करत आहोत. प्रक्रिया आणि साठवण सुविधा बहुविध हाताळणी, अस्वच्छ साठवण यामुळे होणारा अपव्यय कमी करणे आणि विविध उत्पादनांचे मुदत वाढवणे हा प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे. हा उपक्रम सर्वसमावेशक पोर्ट इकोसिस्टम तयार करण्याच्या उद्देशाशी संरेखित करतो.
उन्मेष वाघ, जेएनपीए अध्यक्ष

सुविधा कापणीनंतरचे नुकसान लक्षणीयरीत्या कमी करणार आहे. यासाठी अंदाजे 285 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर उभारण्यात येणार आहे. तसेच जेएनपीए रस्त्यावर अवैध वाहने उभी करणार्‍या वाहनांवर जेएनपीए आत्ता कडक धोरण राबविणार असून या वाहन धारकांचा जेएनपीएतील परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे जेएनपीएच्या जागांवर जी अवैध बांधकामे झाली आहेत ती बांधकामे देखिल 15 ऑगस्ट नंतर तोडण्यात येतील असे जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी सांगितले. तर जेएनपीएची नव्याने आणखी एक कोस्टल रोड बनविण्याची योजना असून बेलपाडा गावाच्या पाठीमागून ते अटल सेतू पर्यंत हा मार्ग बनविण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT