कुरळचे ग्रामसेवक, लिपिकास ५० हजारांची लाच घेताना अटक Pudhari File Photo
रायगड

कुरळचे ग्रामसेवक, लिपिकास ५० हजारांची लाच घेताना अटक

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : घरास घरपट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेताना कुरुळचे ग्रामसेवक आणि लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. ग्रामसेवक श्रीहरी अर्जुनराव खरात, सुजित श्याम पाटील उर्फ पिंट्या अशी या दोघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यांतील तक्रारदार यांचे मौजे कुरूळ गट क्रमांक ३४/४ या जागेवर स्वतंत्र घर बांधलेले आहे. या घरास घरपट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळणेकरीता ग्रामसेवक श्रीहरी खरात यांनी पन्नास हजारांच्या लाचेची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम लिपिक सुजित शाम पाटील उर्फ पिंट्या यांच्याकडे देण्यास सांगितली.

याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. त्याची शहानिशा झाल्यावर एसीबीने कुरुळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला. त्यानुसार मंगळवारी तक्रारदार हे पन्नास हज राराची रक्कम घेऊन कुरुळ ग्रामपंचायतीत दाखल झाले. तेथे त्यांनी लिपिक सुजित शाम पाटील उर्फ पिंट्या याच्याकडे ही रक्कम दिली. त्यानंतर तेथेच असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करीत लिपिकास आणि ग्रामसेवकास ताब्यात घेतले. या प्रकारामुळे कुरुळमध्ये एकच खळबळ माजली. या दोघांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT