White Jamun Benefits Pudhari
रायगड

White Jamun Benefits: पांढऱ्या जांभळांनी घातली खवय्यांना भुरळ

मधुमेह आजारावर गुणकारी असल्याने वाढली मागणी, पनवेलच्या बाजारात विक्रीला प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

दीपक घोसाळकर

पनवेल शहर: जांभळाचे पीक जास्त आल्यानंतर दुष्काळाचे सावट असते असा एक भ्रम पर्यावरण प्रेमींमध्ये पसरवला जात आहे.आता जांभूळ म्हटले की जांभळ्या रंगाचे टपोरीदार असे आपण बालपणापासून पाहत आलो आहोत.

परंतु कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम रित्या केलेला आगळावेगळा बदल त्यामुळे जांभळ्या रंगाच्या ऐवजी पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे उत्पादन आता होऊ लागले आहे. पांढऱ्या रंगाची जांभळे मधुमेह आजारावर फारच गुणकारी असल्याचे बोलले जात आहे. त्याचा फरकही जाणवू लागल्याने या पांढऱ्या जांभळांना आता वाढती मागणी होत आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील भवानीनगर येथील चैतन्य कुलकर्णी या आधुनिक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये या पांढऱ्या रंगाच्या जांभळांची लागवड करून पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करून आता उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. या पांढऱ्या जांभळांनी एपीएमसी मार्केटमध्ये तसेच पनवेल मधील खवय्यांना भुरळ घातली आहे.

जांभूळ हे नेहमी जांभळ्या रंगाचे असते असा आपला नेहमीचाच पाहण्याचा दृष्टिकोन आहे. परंतु कृषीप्रधान देशांमध्ये विविध कृषी विद्यापीठांनी केलेल्या अथक संशोधनातून आता जांभळ्या रंग ऐवजी पांढऱ्या रंगाचे जांभळाची झाडे कृत्रिम रित्या बद्दल करून निर्माण करण्यात आली आहेत चैतन्य कुलकर्णी यांनी आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करून मोठ्या संख्येने पांढऱ्या रंगाचे उत्पादन घेणाऱ्या जांभळाच्या झाडाची लागवड केली आहे.

आपण जांभळाचे सहसा झाड हे उंच वाढलेले पाहत असतो,परंतु अगदी कमी उंचीचे झाड हे चांगल्या प्रकारचे पांढऱ्या रंगाचे जांभळाचे उत्पादन देत असल्याचे चैतन्य कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सहित पनवेल मधील खवय्यांना सुद्धा या जांभळ्या रंगाच्या फळाने चांगलीच भुरळ घातली आहे.200 ते 300 रुपये किलोच्या दरम्यान या जांभळ्या रंगांना तसा दरही मिळत आहे. या जांभळा रंगाच्या फळात (White Jamun / Wax Apple / Water Apple) हा खूप पाणीयुक्त, हलका आणि पौष्टिक फळ आहे.

यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम इत्यादी घटक असतात.पांढऱ्या जांभळाचे आरोग्याला मिळणारे फायदे तसे खूप आहेत. त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवते,यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो व डिहायड्रेशन कमी होते. शरीरातील साखर नियंत्रणास मदत करते.

त्वचेसाठी सुद्धा जांभळ्या तील पोषकतत्वे फायदेशीर आहेत.त्वचा तजेलदार ठेवण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकते. वजन नियंत्रणासाठी उपयोगी, हे कमी कॅलरीचे फळ असल्यामुळे वजन सांभाळण्यासाठी चांगले आहे.

जर कोणी लिव्हर, कोलेस्ट्रॉल आणि हार्ट हेल्थ सांभाळण्याचा प्रयत्न करत असल तर पांढरा जांभूळचे सेवन हे चांगले लाभदायक असा चांगला पर्याय ठरू शकतो. ही पांढरी रंगाची जांभळे जास्त खाल्ल्यास काही लोकांना acidity किंवा loose motion होऊ शकतात असेही यावेळी आवर्जून चैतन्य कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

मधूर,रसाळ,टपोरी

ही जांभळे मधुर रसाळ टपोरी पद्धतीचे असून याची वाढती मागणी लक्षात घेता अजूनही जांभळाच्या झाडाची लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या जांभळाच्या झाडांमध्ये विविध प्रकारचे प्रोटीन्स असून शरीराला खूपच लाभदायक असेच हे फळ असल्याचे बोलले जात आहे. जांभळ्या रंगाच्या जांभळा पेक्षाही जास्त गुणकारी हे पांढऱ्या रंगाच्या जांभूळ असल्याने याला मागणी ही वाढती होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT