नेरळ : आनंद सकपाळ
नेरळ हे कर्जत तालुक्यातील झपाट्याने विकसित होणारे महत्त्वाचे उपनगर असून, मुंबई आणि पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसह जागतिक थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी नेरळ रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. मात्र, या रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. स्थानक परिसरात वाहनांची होणारी गर्दी, रिक्षांची वर्दळ, खासगी वाहनांची ये-जा आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी रेल्वे प्रवाशांसह स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नियमित कर भरणाऱ्या नेरळकरांची या वाहतूक कोंडीतून सुटका नेमकी कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिकां कडून उपस्थित केला जात आहे.
नेरळ रेल्वे स्थानक परिसरात सकाळी आणि सायंकाळी विशेषतः प्रवाशांची मोठी गर्दी असते. कामानिमित्त मुंबई, ठाणे, कल्याण तसेच कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची सतत ये-जा सुरू असते. रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच रिक्षांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे स्थान काबाहेरील रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढून अनेकदा वाहतुकीचा वेग मंदावतो. काही वेळा वाहनचालकांना कोंडीत अडकून राहावे लागते, तर पायी जाणाऱ्या नागरिकांनाही सुर-क्षितपणे मार्ग काढणे कठीण होते.
नेरळ शहराची लोकसंख्या आणि नागरी विस्तार झपाट्याने वाढत असताना त्यानुसार वाहतूक सुविधांचे नियोजन मात्र झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे स्थानक परिसरात वाहनांसाठी पुरेशी जागा, प्रवासी उतरविण्याची स्वतंत्र व्यवस्था, रिक्षांसाठी निश्चित थांबा आणि वाहतुकीचे योग्य नियमन या मूलभूत बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. केवळ वाहतूक कोंडी झाल्यानंतर तात्पुरती व्यवस्था करण्याऐवजी भविष्यातील वाढता प्रवासी भार लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे, नेरळमधील नागरिक विविध प्रकारचे कर भरून स्थानिक स्वराज्य संस्थेला महसूल देतात. मात्र, त्या तुलनेत नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा मिळतात का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. रेल्वे स्थान-काबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेकांच्या दैनंदिन प्रवासाचा भाग बनला असताना संबंधित यंत्रणांकडून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नियोजन, रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, नो-पार्किंग क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती अशा उपाययोजना केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. नेरळचा विकास होत असताना रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न मात्र कायम राहणार असेल, तर या विकासाचा उपयोग सामान्य नागरिकांना काय, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नेरळकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. स्थानक परिसरातील वाहतूक मार्गांचे रेल्वे स्थानक परिसरात वाहनांसाठी पुरेशी जागा, प्रवासी उतरविण्याची स्वतंत्र व्यवस्था, रिक्षांसाठी निश्चित थांबा आणि वाहतुकीचे योग्य नियमन या मूलभूत बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. केवळ वाहतूक कोंडी झाल्यानंतर तात्पुरती व्यवस्था करण्याऐवजी भविष्यातील वाढता प्रवासी भार लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.