पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात रायगड जिल्ह्यातल्या ७ तालुक्यातील ३०८ गावातील १९२७हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहेत pudhari file photo
रायगड

Western Ghat : रायगडमध्ये पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात 308 गावे

जिल्ह्यातील सात तालुक्यांतील 1 हजार 927 हेक्टर क्षेत्र बाधित होणार; बांधकाम, उत्खननावर येणार निर्बंध

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

केंद्र सरकारने पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर केलेल्या पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रात रायगड जिल्ह्यातल्या ७ तालुक्यातील ३०८ गावातील १९२७हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहेत. त्यामुळे प्रस्ताविक प्रकल्प उद्योग, दगडखाणी व जंगलतोड, यासहित फार्म हाऊस संकल्पनेला बंदी येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केरळमधील वायनाड जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे ३०० च्या वर नागरिकांचा मृत्यू झाला. अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली बेपत्ता झालेल्या घटना, डोंगर, टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर बेसुमार जंगलतोड व उत्खनन झाल्यामुळे घडत आहेत. त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत डॉ. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्र राज्यातील बारा जिल्ह्यातील ५६ तालुके व २१५९ गावातील १७३३९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर लागू होऊ शकते. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या ७ तालुक्यातील ३०८ गावातील १९२७हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६३४ चौरस किलोमीटर आहे तर परिसंवेदनशील क्षेत्र २६६ चौरस किलोमीटर येत असून गावांची संख्या २ आहे, खालापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३९५ चौरस किलोमीटर असून परिसंवेदनशील क्षेत्र म्हणून १३३ चौरस किलोमीटर आहे तर यामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांची संख्या २०आहे, महाड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ७९६ चौरस किलोमीटर असून परिसंवेदनशील क्षेत्र ४०९ चौरस किलोमीटर असून गावांची संख्या ७४ आहे.

महाड तालुक्यातल्या गावांची नावे पुढीलप्रमाणे; अड्राई, आंबिवली खुर्द, आंबे शिवथर, बावळे, बेबलघर, चाफे तर्फे गोविले, चापगाव, धाबेकर कोंड, दाभोळ, दापोली, दासगाव, देवघर, डोंगरोली, फौजी अंबावडे, घावरे कोंड रायगड वाडी, धुरूपाचा कोंड, गोठे खुर्द, गोठवली, कडसरी लिंगाणा, करमर, कसबे शिवथर, कावळे तर्फे नाते, कावळे तर्फे विन्हेरे, केतकीचा कोंड, खर्डी खुर्द, किंजळोली बुद्रुक, किंजळोली खुर्द, किये, कोकरे तर्फे गोवेले, कोळोसे, कॉडमालुसरे, कुंबे शिवथर, कु सगाव, मांडले, मांगरून, नडगाव तर्फे तुढील, नांदगाव खुर्द, नेराव, पडवी, पंदेरी, पाने, पांगारी, पारामाची, पारवाडी, फाळकेवाडी, पिंपळकोंड, पिंपळवाडी, पुनाडे तर्फे नाते, रानवडी खुर्द, रावतळी, सादोशी, सावरट, शेवते, सिंगर कोंड, सोलम कोंड, सुतार कोंड, तळीये, तळोशी, ताम्हणे, तेलंगे मोहल्ला, वडघर खुर्द, वाघेरी, वसाप, वीर, विन्हेरे, वाघोली, वहुर, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, वाळसुरे, वरणडोली, वारंगी ही महाड तालुक्यातील गावे आहेत.

माणगाव तालुक्याचे, भौगोलिक क्षेत्र ६७५ चौरस किलोमीटर असून परिसंवेदनशील क्षेत्र २३८ चौरस किलोमीटर असून यामध्ये ४७ गावांचा समावेश आहे. पोलादपूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३५४ चौरस किलोमीटर आहे. यामध्ये परिसंवेदनशील क्षेत्र १७९ चौरस किलोमीटर असून गावांची संख्या ३५ आहे. रोहा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६०३ चौरस किलोमीटर असून परिसंवेदनशील क्षेत्र ३८३ चौरस किलोमीटर असून गावांची संख्या ११८ आहे. सुधागड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ४४४ चौरस किलोमीटर असून परिसंवेदनशील क्षेत्र ३१९ चौरस किलोमीटर असून गावांची संख्या १२ आहे. एकंदरीत रायगड जिल्ह्यातील एकूण

भौगोलिक क्षेत्र ३९०१ चौरस किलोमीटर ७तालुक्याचे असून त्यामध्ये परिश संवेदनशील क्षेत्र म्हणून १९२७ चौरस किलोमीटर आहे तर या ७ तालुक्यातील समाविष्ट गावांची संख्या ३०८ आहे. गावातील प्रत्यक्ष नैसर्गिक भू क्षेत्र यामध्ये वनक्षेत्र, नदी, सरोवर, शासकीय पडीक जमीन, किंवा गायरान क्षेत्र, देवस्थान जमीन इत्यादींचा समावेश या परिसंवेदनशील क्षेत्रामध्ये असून गावठाण क्षेत्र, कृषी क्षेत्र अ कृषी क्षेत्र मानवनिर्मित भुवापर क्षेत्र शासनाने यापूर्वी संकलित केलेली आहे.

जिल्ह्यातील सात तालुक्यांतील गावे

पश्चिम घाट पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबाबत राज्य शासनाकडून २०१४ मध्ये याबाबत अभिप्राय मागवले होते. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, पोलादपूर, रोहा व सुधागड या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेल्या अहवालात राज्यातील सुमारे १७३४० चौरस किलोमीटर क्षेत्र परिसंवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याचे नमूद केले होते, त्यानुसार राज्यातील अहमदनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांतील २२०० गावांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT