Bharat Gogawale Pudhari
रायगड

Varandha Ghat ST Bus Service: वरंधा घाटातून बससेवा पूर्ववत करण्याचा मार्ग सुकर; गोगावल्यांच्या प्रयत्नांना यश!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड-पुणे जोडणाऱ्या वरंधा घाटातून बंद असलेली एसटी बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने सेवेला हरकत नसल्याचे पत्र दिले.

पुढारी वृत्तसेवा

महाड: रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटातून बंद असलेली एसटी सेवा पूर्ववत चालू करण्याबाबत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पुणे यांनी वरंधा घाटातून एसटी बस सेवा चालू करण्याबाबत हरकत नसल्याचे पत्र परिवहन महामंडळाच्या पुणे आगाराला दिल्याने गणेशोत्सव काळात वरंधा घाटातून पुन्हा मार्गे एसटी बस सेवा चालू झाल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे .

रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटात रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे त्यातच पावसाळ्यात रायगड जिल्हा हद्दीत व पुणे जिल्हा हद्दीमध्ये वारंवार घाटात भूस्खलन होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्हाधिकारी व पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडून पावसाळ्यात घाट बंद ठेवला जातो.

रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटातून पूर्वी बंद असलेली एसटी सेवा आता गणेशोत्सव काळात चालू होणार असल्याने महाड पुणे जाणाऱ्या प्रवाशांना माणगाव मार्गे ताम्हिणी घाटातून जाण्याचा वळसा आता कमी होणार आहे त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील शिंदेवाडी फाट्यापासून ते वेनवडी गावापर्यंत असणाऱ्या १२ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीट करण्याचे काम पूर्ण केले आहे तर वेनवडी ते निगुडघर ही लांबी १३ किलोमीटर असून स्थानिक शेतकरी न्यायालयात गेल्याने येथील काम अद्याप प्रलंबित असले तरी रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचे कळवले आहे

महाड तालुका व भोर तालुक्यातील प्रवाशांसाठी गरजेचे

पुणे जिल्हा येथील भोर तालुक्यातील निगुडघर ते हिरडोशी ही लांबी 22 किलोमीटर असून त्याचे देखील काँक्रीट करण्याचे काम पूर्ण झाले आहे मात्र वनविभागाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ७ किलोमीटर लांबीचे काम अद्याप प्रलंबित आहे.

त्याला देखील मंजुरी मिळाल्याची राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पुणे यांनी स्पष्ट केले आहे तर उंबर्डे ते रायगड जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीट करण्याचे काम देखील पूर्ण झाले असून आता एसटी वाहतुकीसाठी रस्ता सुस्थितीत असल्याचे कळवल्याने महाड वरंधा घाटातून भोर मार्गे पुणे जाण्याचा महाड कारंजा मार्ग सोयीचा झाला आहे. आता प्रतीक्षा आहे ती एसटी सेवा पूर्वीसारखी पूर्ववत चालू होणे ही दोन्ही जिल्ह्यातील महाड तालुका व भोर तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT