Vadodara Mumbai Expressway Pudhari
रायगड

Vadodara Mumbai Expressway: बडोदा–मुंबई द्रुतगती महामार्गामुळे माथेरान पर्यटनाला नवे बळ

2026 मध्ये टप्प्याटप्प्याने महामार्ग खुला; गुजरातमधील पर्यटकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

माथेरान : मिलिंद कदम

मुंबई आणि महामुंबई परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. हा महामार्ग 2026 मध्ये टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला केला जाणार असून यामुळे मुंबई शहरात प्रवेश करणे अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. परंतु या महामार्गाचा सर्वात जास्त फायदा माथेरान पर्यटन नगरीला होणार असून या मार्गामुळे गुजरात ते माथेरान हे अंतर तर कमी होणारच आहे परंतु माथेरान थेट मोठ्या शहरांशी जोडले जाणार असल्याने माथेरानचे पर्यटन वाढणार आहे.

माथेरानचे पर्यटन हे मुख्यत्वे गुजरात मधील पर्यटकांवर अवलंबून असते. परंतु यातून माथेरानला येणे त्रासदायक ठरत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी होती. माथेरानकडे येणाऱ्या पर्यटकांना ठाणे येथील फाउंटन हॉटेल चेक नाका व विविध ठिकाणी पोलिसांकडून ही मोठ्या प्रमाणात तपासणीला सामोरे जावे लागत होते. ज्यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी होती त्यातून आता सुटका होणार आहे हा महामार्ग बदलापूर येथून जाणार असून गुजरात मधील पर्यटक आता थेट माथेरान मध्ये येऊ शकतात.

पनवेल येथे सुरू झालेले विमानतळ ,नवीन महामार्ग यामुळे पनवेल मार्गे माथेरान मध्ये रस्ता असा अशी मागणी माथेरानमध्ये जोर धरू लागली आहेत. गुजरात आणि उत्तर भारतातून येणारी हजारो मालवाहू वाहने दररोज जेएनपीए येथे येतात. ही वाहने प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, घोडबंदर रोड, ठाणे-बेलापूर किंवा मुंब्रा-तळोजा मार्गांचा वापर करतात. त्यामुळे पालघर, वसई, विरार, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात कायम वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची थेट जोड मिळणार आहे. भिवंडी जवळील आमने येथे दोन्ही महामार्गांमध्ये इंटरचेंज असणार आहेत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि जेएनपीए बंदराकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.

आठपदरी द्रुतगती महामार्ग

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णपणे नव्या आठ पदरी बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्गाची उभारणी सुरू केली आहे. हा महामार्ग महाराष्ट्रात तलासरीपासून मोरबे म्हणजेच बदलापूरजवळ पर्यंत एकूण 156 किमी लांबीचा असेल. या महामार्गाचा पहिला टप्पा तलासरी ते शिरसाड दरम्यान 79.8 किमीचा आहे. यातील तलासरी ते गंजाड हा भाग पूर्ण झाला असून उर्वरित काम फेब्रुवारी-मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा शिरसाड ते मोरबे असा 76.88 किमीचा असून तो एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT