उरण : राजकुमार भगत
शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची आणि तिच्या मैत्रिणीची तब्बल 38 लाख 14 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ’इन्व्हेस्को सेट मॅनेजमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ’ओपेनहायमर’ यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे. फसवणूक करणार्यांनी बनावट वेबसाइट आणि व्हॉट्सप ग्रुपच्या माध्यमातून ही मायावी जाळी विणली होती.
तक्रारदार शिवनारायण सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आणि त्यांची मैत्रीण निशा म्हात्रे यांना 9 जून 2025 रोजी नैना भाटिया नावाच्या एका महिलेने ’300-ODM-X VIP Growth Circle या व्हॉट्सप ग्रुपमध्ये अॅड केले. या ग्रुपवर, ’इन्व्हेस्को सेट मॅनेजमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या नावाने शेअर बाजारात ट्रेडिंगची माहिती दिली जात होती.
त्यानंतर, त्यांना एका वेबसाइटची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक पाठवण्यात आली. ही आमची कंपनी असून ती सेबीकडे नोंदणीकृत आहे. आम्ही प्रायव्हेट प्लेसमेंट, आयपीओ वाटप आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतो. आमची तज्ज्ञ टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि 800टक्के परताव्याची हमी आहे, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले.
या भामट्यांनी तक्रारदारांचा विश्वास जिंकण्यासाठी मूळ कंपनीसारखी दिसणारी बनावट वेबसाइट तयार केली होती. इतकेच नाही, तर त्यांनी भारतीय शेअर बाजाराचे नियामक मंडळ असलेल्या ’सेबी’चा बनावट नोंदणी क्रमांक वापरून आपली कंपनी कायदेशीर असल्याचे भासवले. यावर विश्वास ठेवून तक्रारदार आणि त्यांच्या मैत्रिणीने, तसेच काही रक्कम रोख स्वरूपात, त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण 38 लाख 14 हजार 500 रुपये गुंतवले.
काही काळानंतर, गुंतवलेले पैसे काढण्याची (विथड्रॉल) मागणी केली असता, जया अगरवाल , नैना भाटिया आणि इतर दोन धारकांनी पैसे देण्यास त्यांना नकार दिला.उलट, तक्रारदार महिलेला व्हॉट्सपवर व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करून शिवीगाळ करण्यास त्यांनी सुरुवात केली. प्रकरण इथेच थांबले नाही, तर घरी आणि ऑफिसमध्ये येऊन मारहाण करण्याच्या धमक्या त्यांना देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार महिलेने सांगितले की, त्यांनी अॅपच्या माध्यमातून काही पैसे काढले होते, जे त्यांना वेगवेगळ्या खात्यांमधून एकूण 2लाख 52हजार 018 रुपये परत मिळाले आहेत.
विशेष म्हणजे, https://www.google. com/oppenheimer marketfunds.com' या वेबसाइट आणि AmAmonoZhm व 'ODMAX'नावाने चालणार्या व्हॉट्सप ग्रुप्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान फसवणूकीच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि अनोळखी ग्रुप्सच्या माध्यमातून येणार्या गुंतवणुकीच्या योजनांमधील धोका समोर आला आहे. उलवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी गुंतवणुकीपूर्वी संबंधित कंपनी आणि योजनेची करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
फसवणूकीच्याया घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि अनोळखी ग्रुप्सच्या माध्यमातून येणार्या गुंतवणुकीच्या योजनांमधील धोका समोर आला आहे. उलवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी संबंधित कंपनी आणि योजनेची सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
सावधानतेचा आधीच दिला होता इशारा
‘इन्व्हेस्को सेट मॅनेजमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ ने यापूर्वीच 'https://www.google. com/oppenheimer marketfunds.com' या वेबसाइट आणि ओपेनहायमर नावाने चालणार्या व्हॉट्सप ग्रुप्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. नागरिकांनी गुंतवणुकीपूर्वी संबंधित कंपनी आणि योजनेची सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर खात्री करावी.