भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे कर्जतमध्ये महायुती अडचणीत pudhari photo
रायगड

Raigad ZP Election : भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे कर्जतमध्ये महायुती अडचणीत

अर्ज माघारीनंतर जि.प.-पं.स. निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट; न.प. निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आघाडी होण्याबाबत निश्चित मानले जात असतानाच महायुतीबाबत अद्याप स्पष्टता दिसून येत नाही, त्यामुळे शिवसेना शिंदे गट-भाजप-शेकापची युती गुलदस्त्यात असून अर्ज माघारीनंतरच युतीचे चित्र स्पष्ट होईल का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कर्जत तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट हेही निवडणूक परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर होऊन आघाडीतील सर्व समाविष्ट पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त यांच्या एकत्रीत आढावा बैठका देखील सुरू झाल्या आहेत. त्यामध्येच या निवडणुकीत काँग्रेसने आपले चार व मनसेने ही आपले उमेदावार हे रिंगणामध्ये उतरवले आहेत.

दुसरीकडे नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची 27 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख असल्याने, मात्र महायुतील घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट व भाजपा यांची पारंपरिक असलेली युती ही जाहीर न होता सध्या परिस्थितीमध्ये गुलदस्त्यामध्ये आहे. त्यामध्येच कर्जत नगरपरिषद निवडणूकीमध्ये महायुती असताना मात्र भाजपाचा झालेला दारुण पराभव व फक्त एक उमेदवार निवडून आल्याचे शल्य हे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या जिवारी लागल्याने त्यांची शिवसेना शिंदे गटाविरोधात उघडपणे होत असलेली नाराजी व त्यामध्ये देण्यात आलेला स्वबळाचा नारा पाहाता यांच्यातील युती ही होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मात्र शेवटपर्यंत ही युती गुलदस्त्यामध्ये राहून पुढे भाजपा या निवडणुकीमध्ये स्वबळावर समोरे जाणार का या कडे सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळीचे लक्ष लागले आहे. तर एकीकडे शिवसेना शिंदे गट व शेकाप पक्षाची युती झाल्याची चर्चा होत असताना मात्र शेकापच्या उमेदवारांनी देखील आपले नामनिर्देशन अर्ज भरले असल्याने, व शिवसेना शिंदे गट व शेकापचे पुढारी यांच्याकडून कोणत्याही पत्रकार परिषदेतून तसे जाहीर केले नसल्याने, मात्र शेकापचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र देखील आहे.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत शेकापचे किती उमेदवार हे युतीच्या माध्यमातून निवडणूकीच्या रिंगणात असणार की सर्व उमेदवार हे स्वबळावर ही निवडणूक लढविणार हे 27 जानेवारी नंतर स्पष्ट होणार असल्याने, मात्र या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये परिवर्तन विकास आघाडी जाहीर झाली असल्याने व शिवसेना शिंदे गट, भाजपा व शेकाप यांच्या युती सध्या गुलदस्त्यामध्ये आहे.

या निवडणूकीतील लढती संदर्भात या तिन ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते हे संभ्रम अवस्थेत असल्याचे चित्र पहाता, शिवसेना शिंदे गट, भाजप व शेकापची युती गुलदस्त्यातील गुपित अर्ज मागे घेण्याचे तारखेनंतर स्पष्ट होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा फायदा व तोटा हा नेमका कोणत्या राजकीय पक्षांना होणार या कडे तालुक्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

कर्जत - रवालापूर विधानसभा 2024 च्या निवडणूकीतील निकाल पहाता व या निवडणूकीमध्ये भाजपा, आरपीआय व शिवसेना शिंदे या पक्षांच्या महायुतीचे तथा शिवसेना शिंदे गटाचे निवडून आलेले उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांना 94,871 मते, तर पराभूत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना दुसऱ्या क्रमांकाची 89,177 मते व शिवसेना उबाठा पक्षाचे पराभूत उमेदवार नितीन नंदकुमार सावंत यांना तिसऱ्या क्रमांकाची 48,929 मते पडली होती.

नगर परिषद निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव

विधानसभा 2024 च्या निवडणूकीतील मिळालेल्या मतांच्या आकडेवारी व त्यामध्येच कही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कर्जत नगर परिषद निवडणूकीत महायुतीचा झालेला पराभव पाहता, या होणाऱ्या कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये परिवर्तन विकास आघाडी निश्चित मानली जाते तर शिवसेना शिंदे गट, भाजपा व शेकापला फटका बसण्याची शक्यता देखील नाकरता येत नसल्याची चर्चा ही राजकीय विश्लेषकांमधून वर्तविली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT