Tulsi Vivah  
रायगड

Traditional Tulsi Vivah -पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाहास २१ नोव्हेंबरपासून सुरुवात

या वर्षी लग्नासाठी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जवळपास १४ मुहूर्त; लग्नाचे बार उडणार

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : दिवाळीच्या सणा नंतर कार्तिक एकादशी पासून तुळशी विवाहाला सुरवात होत असते ती त्रिपुरारी पिर्णिमा पर्यंत या दिवसात घरोघरी तुलशी वृदावन सजवत ऊसाची कांडी, व साहित्याने विवाह लावण्यात येत आहे या साठी बाजारात ऊस कांडी सह पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सज्ज झाली आहे.

या विवाह नंतर हिंदू संस्कृती नुसार लमसोहळ्याला सुरवात होत असते आजही ग्रामीण भागा प्रमाणे शहरी भागात सायंकाळी 6 ते 7.30 च्या दरम्यान तुळशीचा विवाह साजरा करण्यात येत आहे आजही तुळशी विवाहाची आख्यायिका सांगितली जाते शनिवारी 21 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यत तुळशी विवाह गावागावात संपन्न होणार आहे यानंतर हिंदू धर्मानुसार लग्न सराई ला सुरवात होणार आहे या वर्षी नोव्हेंबर चा शेवट व डिसेंबर मध्ये जवळपास 14 मुहूर्त असल्याने ठिकठिकाणी लग्न सराई ची लगबग दिसुन येणार आहे. बाजारपेठ मध्ये उसाची कांडी सह पूजेचे साहित्य उपलब्ध असल्याने महिला वर्ग खरेदी करत आहेत या तुळशी विवाह नंतर लग्नसराईला सुरवात होत असल्याने बाजारपेठ सज्ज झाली आहे अनेक ठिकाणी तुळशी वृदावन नसल्याने अनेक महिला प्लस्टिक सारख्या कुडी खरेदी करत आहेत त्याच प्रमाणे रोप ही विक्रीला उपलब्ध आहेत.

तुळशी विवाह हा श्रीविष्णू शी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.

हिंदु धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती बहुतेक हिंदू कुटुंबांच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. घरातील तुळशी वृंदावनाची-तु ळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोरं, चिंच, आवळा, त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णा ची करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो.

तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची ड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे.

तुळशी विवाह हा श्रीविष्णू शी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT