श्रीवर्धन | भारत चोगले
सध्या थंडीने चांगलाच जोर पकडला आहे.त्याचबरोबर पर्यटनातही वाढ होताना दिसत आहेत.श्रीवर्धन ते बागमांडला ,मुरूड ते दिघी दरम्यान सुरू असलेल्या फेरी बोट सेवेमुळे श्रीवर्धनसह मुरुडमध्ये पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे.याचा फायदा स्थानिक व्यावसायिकांना होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटन आवर्जून येत आसतात . श्रीवर्धन मधील समुद्रकिनार्यावर जवळ केलेले सुशोभीकरण हे पाहिले तर मुंबई येथील चौपाटी पेक्षा अधिक सुंदर नक्कीच असल्याने ते पाहण्यासाठी व तेथील विद्युत रोषणाई पाहण्यासाठी तसेच त्या ठिकाणी निवांत समुद्र किनार्यावर बसून मनमुराद आनंद घेण्यासाठी पहिली पसंती नक्कीच पर्यटक श्रीवर्धन ला करताना दिसत असतात.
हे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याबरोबरच येथील तीर्थस्थळे पाहण्यासाठी तसेच श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरील सुशोभिकरण पाहण्.ृसाठी आणि तेथील मन मुराद आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटकांना श्रीवर्धनमध्ये यायचा असेल तर ते बागमांडला जेटीचा उपयोग करतात त्याच प्रमाणे मुंबई, गुजरात राज्यातील इतर ठिकाणांहून पर्यटक अलिबाग मुरूड दिघीच्या जेटीचा उपयोग करतात. या दोन्ही जेटीमुळे पैसा हा वाचतोच शिवाय महत्वाचे वेळेची बचत होते. त्याच प्रमाणे गाडीला डिझेल हि कमी लागतो . त्यामुळे राज्यभरातील पर्यटक ह्या दोन्ही जेटीला पहिली पसंती करताना दिसतात.
दिघी जेटी मधून मुंबई, ठाणे, अलिबाग, मुरूड, गुजरात या जेटीचा उपयोग करतात. मुंबई किंवा अलिबाग या ठिकाणाहून काही तासाच पर्यटक हे श्रीवर्धन तालुक्यात पोहचू शकतात. दिघी जेटी व बागमांडला ह्या दोन्ही जेटीमधुन चारचाकी, दोन चाकी, तीन चाकी, सहा चाकी गाड्या ह्या मधून वाहतूक केली जाते. त्यामुळेच वेळ हि वाचतो शिवाय पैशांची बचत होते.. शिवाय पर्यटकांना समुद्रातील मज्जाही घेता येते. याचा अनुभव शेकडो पर्यटन घेताना दिसतात.
बागमांडला जेटी मधून रत्नागिरी, गोवा इत्यादी ठिकाणाहून येणारे पर्यटक ह्या जेटीचा उपयोग करतात या जेटीमुळे रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याला जोडला गेला आहे.