स्वप्नील पाटील
पेण: पेण तालुक्यातील कळवे गावात शनिवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित तिसरी मुंबईच्या ‘नव नगर’ प्रकल्पासाठी जमिन संपादना संदर्भात आयोजित बैठकीत प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला. या प्रकल्पाच्या विरोधात 19 हजार हरकती नोंदविण्यात आलेल्या आहेत. तरीही याबाबत कोणतीही सुनावणी घेण्यात आली नाही.यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत.
कळवे,ता. पेण येथे झालेल्या पहिल्याच बैठकीसाठी आमदार रविंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, तहसिलदार तानाजी शेजाळ विविध विभागांचे अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, डी.बी पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते त्याचप्रमाणे एमएमआरडीए अधिकारी पडवळ, गणेशमूर्तीकार व विभागातील शेतकरी वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमएमआरडी अधिकारी पडवळ यांनी प्रस्तावीत प्रकल्पाची रूपरेषा मांडत शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीपासूनच बैठकीत शेतकऱ्यांचा असंतोष स्पष्ट जाणवत होता. सुमारे तीनशे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ‘नव नगर’ प्रकल्पाला थेट विरोध नोंदवत अनेकांनी ‘आम्हाला प्रकल्प नको’ अशी भूमिका मांडली.
प्रशासनाने विकासाचे फायदे मांडले असले तरी शेतकऱ्यांनी पूर्वीच्या सेझ अनुभवांचा दाखला देत ‘विकास की फसवणूक?’ हा मूलभूत प्रश्न उपस्थित केला. खाजगी व्यवहार, अपूर्ण करार आणि 7/12 उताऱ्यांवरील नोंदी यामुळे प्रत्यक्ष ताबेदार शेतकरी वंचित राहिल्याचे सांगत संमतीपत्राद्वारे संपादनाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. ‘केवळ संमतीपत्रावर जमीन घेणे अन्याय कारक आहे’ असे सांगत 25.5 % योजनेलाही स्पष्ट नकार देण्यात आला, तर सेझ प्रमाणेच पुन्हा फसवणूक होण्याची भीती व्यक्त झाली.
लोणावळा आणि खंडाळा घाटात त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मिसिंग लिंकमुळे या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी दिली.
केवळ कार आणि बसलाच प्रवेश: मुंबई-पुणे या मिसिंग लिंकवरून सुरुवातीला 6 महिने केवळ कार आणि बस या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. अवजड वाहने आणि धोकादायक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जुन्या घाट मार्गचा वापर करावा लागेल. या एक्स्प्रेस वेवरील एकूण रहदारीपैकी सुमारे 70 टक्के हिस्सा हा कार आणि बसचाच असतो तर 30 टक्के अवजड वाहतूक या मार्गाने होते. मिसिंग लिंकमुळे वाहतुकीचा ताण कमी होणार असून ट्रॅफिक जामची समस्या सुटण्यास मदत होईल.