कामठेतून तरुण बेपत्ता, मोटार सायकल घेवून बाहेर पडला परत आलाच नाही File Photo
रायगड

Raigad | कामठेतून तरुण बेपत्ता, मोटार सायकल घेवून बाहेर पडला परत आलाच नाही

गणेश सोनवणे

पनवेल ः कामठा येथील किराणा मालाच्या दुकानात आपल्या वडिलांना सोडून पनवेल येथील स्वामी मठ येथे जात असल्याचे सांगून मोटार सायकल घेवून बाहेर पडलेला तरुण घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

अजित श्रीरंग हुंबरे (32) असे या तरुणाचे नाव असून, चेहरा गोल, रंग सावळा, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे, बांधा सडपातळ, उंची 5 फुट 10 इंच असून, अंगात काळ्या पट्ट्याचा ग्रे रंगाचा टी-शर्ट व पायात ऑफव्हाईट रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. त्याच्या कपाळात जुन्या जखमेची खुण आहे. तसेच सोबत मोटार सायकल एमएच-46-एएस-0034 व मोबाईल फोन आहे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उरण पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT