The system is on alert mode for possible disasters.
महाड : श्रीकृष्ण बाळ
आगामी पावसाळी मोसमा मध्ये देिण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार होणाऱ्या संभाव्य आपत्तीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी अलर्ट वर राहावे असे निर्देश राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी मंत्री ना भरत शेठ गोगावले यांनी आज शासकीय विश्रामगृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीमध्ये दिले.
महाडच्या शासकीय विश्रामगृहात आज मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आगामी दोन्ही न्नराज्याभिषेक सोहळे तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व संभाव्य आपत्तीपासून सर्व विभागांच्या करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रांताधिकारी पोपट ओमासे तहसीलदार महेश शितोळे, डीवायएसपी शंकर काळे, यांसह सर्व शासकीय यंत्रणांचे विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकारी व व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर मार्गदर्शन करताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले की २०२१ मध्ये आलेल्या महाप्रलयाच्या आठवणी पुन्हा येऊ नयेत म्हणून तातडीने शासनाने दोन वर्ष केलेल्या नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामांमुळे महाडमध्ये पुन्हा मागील तीन वर्षात महापूर आलेला नाही असे त्यांनी निदर्शनास आणले.
जनतेच्या हितासाठीच शासनामार्फत कामे केली जातात असे सांगून महाडकरांच्या पुरा संदर्भातील असलेल्या मागण्यांबाबत नदीपात्रातील गाळ काढण्यास मंजुरी
चालू वर्षी देखील नदीपात्रातील गाळ काढण्याची मंजुरी घेण्यात आली असून त्यातील तांत्रिक परवानगी येत्या दोन दिवसात प्राप्त होईल असे सांगून जेवढे शक्य आहे तेवढे गाळ काढण्याच्या कामासाठी प्रयत्न करू असे जाहीर केले.
शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली असून कोणत्याही परिस्थितीत कोणतीही बाब चुकीच्या पद्धतीने होणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी उपस्थित सर्व विभागाने आगामी पावसाळ्याच्या चार महिन्यांकरिता तसेच राज्याभिषेक सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती मंत्री महोदय व उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना दिली.
विविध विभाग प्रमुखांनी दिलेल्या माहिती दरम्यान मंत्री भरत शेठ गोगावले यांनी विभागांतर्गत शासनाकडून अपेक्षित असलेल्या कामांच्या मंजुरीबाबत तसेच कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत चौकशी करून कोणत्याही अडचणी उत्सब आपणास थेट संपर्क साधावा असे सांगितले. आगामी आठ दिवसावर आलेल्या रायगड वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी या मार्गावरील झालेल्या दुर्घटनाग्रस्त रस्त्याची पाहणी करण्यासाठी आपण जाणार असल्याचेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. दरम्यान, या आढावा बैठकीतही गोगावले यांनी संभाव्य आपत्तीजन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे सुचित केले. लोकप्रतिनिधींसह स्थानिकांशी संवाद साधत कुठल्याही प्रकारची हानी होऊ न देता सामुहिकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी या बैठकीत उपस्थितांना केले.
- भरतशेठ गोगावले, मंत्री रोहयोअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीच्या नुकसाना संदर्भात पंचनामेची कामे सुरू असून शासनाकडे या संदर्भात तसेच आंबा उत्पादकांच्या मदतीसाठी विशेष नुकसान भरपाई चे पॅकेज मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.