raigad
रायगडात बेवारस मृतदेहांचे गुढ वाढतेय file photo
रायगड

रायगडात बेवारस मृतदेहांचे गुढ वाढतेय

पुढारी वृत्तसेवा
अलिबाग : रमेश कांबळे

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरणासोबत नागरिकरण वाढल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाला जिल्ह्यात ९ ते १० गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी होत आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांची दमछाक होत आहे. त्यातच आत्ता पोलिसांसमोर ठिकठीकाणी बेवारस सापडणाऱ्या मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान समोर ठाकले आहे. तसेच बेवारस मृतदेहांचे नातेवाईक न सापडल्यास कोही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही पोलिसांना करावे लागत असल्याचे वास्तवही समोर आले आहे. रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्यानं वाढत आहे. त्याच बरोबर येथील नागरीकरणातही वाढ होत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले.

काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील ?

रायगड जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. एकाद्या व्यक्तिचा खून करुन त्याचा मृतदेह जिल्ह्यातील निर्जन स्थळी टाकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिना बोरा हिची मुंबईत हत्या करुन मृतदेहाची रायगड जिल्ह्यात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पोलिसांवर

सापडलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह हे वैद्यकीय महाविद्यालयाला दिले जातात. ते. कित्येकदा पोलिसांना तपास करण्यास काही महिने लागतात. परिणामी मृतदेह सडू लागतात. या मृतदेहाचे अंत्यविधी करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. खर्चही पोलिसांना करावा लागतो.

SCROLL FOR NEXT